Ad will apear here
Next
पुण्यातील प्रा. सय्यद यांना अँपुल सीलिंग मशीनचे पेटंट

पुणे : औषध निर्मितीत उपयुक्त असणाऱ्या अँपुल सीलिंग मशीनच्या संशोधित डिझाइनचे पेटंट पुण्यातील प्रा. रजत सय्यद यांना मिळाले आहे. प्रा. रजत सय्यद महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्राध्यापक असून, त्यांनी संशोधन करून हे स्वस्त आणि सहज हाताळता येणारे मशीन तयार केले आहे. भारत सरकारच्या कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स अँड ट्रेड मार्क्स विभागाने त्यांच्या या मशीनच्या पेटंटसाठीच्या अर्जाला मान्यता दिली आहे. 

प्रा. सय्यद यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZXICF
Similar Posts
‘सूर्यदत्ता’तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पुणे : ‘आजच्या धावपळीच्या जगात आपले आरोग्य चांगले राहणे क्रमप्राप्त आहे. बैठे काम, वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूड-जंकफूडचे सेवन, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे अशा विविध गोष्टीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर उपचार करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. शिवाय वेळ जातो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो
अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. ए. इनामदार यांचा गौरव पुणे : ‘विजापूरहून केवळ १५ रुपये घेऊन पुण्यात आलो. त्यानंतर अनेक संकटांवर मात करून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शिक्षणसंस्थेचे कार्य वाढवले. या संस्थेच्या आज ३१ शाळा, महाविद्यालये आहेत. २८ हजार विद्यार्थी संस्थेत शिकत आहेत. या यशामध्ये ईश्वराची कृपा, गरिबांचे आशीर्वाद, पुणेकरांचे प्रेम
पुण्यात झाली ‘गुंतागुंतीच्या लैंगिक प्रवृत्ती’ या विषयावरील राष्ट्रीय परिषद पुणे : येथील किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल रिसर्च सेंटर (केईएमएचआरसी) आणि बायर इंडिया यांच्या वतीने ‘ऑनलाइन आवडी-निवडी, ऑफलाइन परिणाम : डिजिटल जगातील गुंतागुंतीच्या लैंगिकतांमधून वाट काढताना’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
२५० महिलांनी घेतला कर्करोग तपासणी शिबिराचा लाभ कोपरगाव : स्तनाचा कर्करोग जागरूकता महिन्यानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कर्करोग तपासणी आणि जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २५० महिला, मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language